बदायू गँगरेप प्रकरण : सचिवांची हकालपट्टी, CBI होणार चौकशी

May 31, 2014 7:53 PM0 commentsViews: 720

6badun_gang_rape31 मे : उत्तर प्रदेशमधल्या बदायू बलात्कार आणि खून प्रकरणी आता सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. सीबीआय चौकशीला राज्य सरकार तयार आहे आणि त्याबाबतची शिफारस लवकरच केंद्र सरकारकडे पाठवली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही मागणी केल्याचं आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितलं.

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पीडित मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सीबीआय चौकशीची मागणी केली. या खटल्यात वेळेत आणि योग्य कारवाई केली नसल्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर चौफेर टीका होतेय.

 

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव जावेद उस्मानी यांची हकालपट्टी करण्यात आलीय आणि त्यांच्याजागी आलोक रंजन यांची नियुक्ती करण्यात आलीय. भाजपने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आज पाचव्या आरोपीला अटक करण्यात आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close