मराठी ‘वेटिंग फॉर गोदो’मध्ये टॉम ऑल्टर

April 14, 2009 3:40 PM0 commentsViews: 3

14 एप्रिलमाधुरी निकुंभ वेटिंग फॉर गोदो या मराठी नाटकाच्या नव्या संचात टॉम ऑल्टर काम करतोय. तो पहिल्यांदाच मराठी नाटकात काम करतोय. यापूर्वीही या नाटकाचे मराठी प्रयोग झाले आहेत. पण दिग्दर्शक अरूण होर्णेकर नव्या संचात हे नाटक घेऊन येताहेत. वेटिंग फॉर गोदो हे सॅम्युअल बेकेट यांचं जगभरात गाजलेलं फ्रेंच नाटक. हे नाटक जगभरातल्या विविध भाषांमध्ये अनुवादित केलं गेलं. नाटकातून शाब्दिक संघर्ष आणि दमदार स्टोरीलाईन हाच या नाटकाचा गाभा आहे. दुसर्‍या महायुद्धाचे जगावर झालेले परिणाम आणि लोकांच्या वागण्यातले बदल हे या नाटकाचं कथासूत्र.ऍबसर्ड जॉनर पद्धतीच्या या नाटकात 4 व्यक्तिरेखा आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग 29 मे ला रवींद्र नाट्यमंदिरात होणार आहे.

close