कोण जिंकणार चॅम्पियनशिप; वीर की झारा?

June 1, 2014 12:06 PM2 commentsViews: 2062

shahrukh and prety IPL

1 जून :  सिनेअभिनेत्री प्रीती झिंटाचा संघ पंजाब आणि बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा टीम कोलकाता यांच्यातील सामना अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे. मात्र, आयपीएलच्या विजेतेपदासाठी वीर- झारा आज आमने सामने येणार आहेत त्यामुळे बॉलिवूडचंही लक्ष या मॅचकडे असणार आहे

आयपीएल- 2012 मधील विजेता कोलकाता नाइट राइडर्सविरूद्ध किंग्ज इलेवन पंजाब पहिल्यांदा फायनलमध्ये खेळणार आहे.  आयपीएलच्या पहिल्या हंगामात पंजाबनं सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती पण त्यानंतर त्यांना दरवेळी लीगमधूनच बाहेर पडावं लागलं होतं. अखेर यावेळी त्यांनी सुरुवातीपासून आपला धडाका कायम ठेवत फायनल गाठली आहे. तर कोलकात्यानं या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही टीम्समध्ये उत्तम खेळाडूंचा भरणा आहे त्यामुळे फायनलमध्ये आता कोण बाजी मारतंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (रविवार) रात्री आठ वाजता फायनलमध्ये  खेळणार आहेत. किंग्ज इलेवन पंजाबने क्वालिफायर-2 मध्ये दोनदा विजेता झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारुन फायनलमध्ये धडक दिली आहे.

एक नजर टाकूया आयपीएलच्या गतविजेत्यांवर…

 • 2008 – राजस्थान रॉयल्स

चेन्नई सुपर किंग्जचा केला पराभव

 • 2009 – डेक्कन चार्जर्स

बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा केला पराभव

 • 2010 – चेन्नई सुपर किंग्ज

मुंबई इंडियन्सचा केला पराभव

 • 2011 – चेन्नई सुपर किंग्ज

बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा केला पराभव

 • 2012 – कोलकाता नाईट रायडर्स

चेन्नई सुपर किंग्जचा केला पराभव

 • 2013 – मुंबई इंडियन्स

चेन्नई सुपर किंग्जचा केला पराभव

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • mayur murkute

  vbm

 • https://www.facebook.com/ankush.samrut Ankush Samrut

  Super IPL7 Matches….Play

close