गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचं निधन

June 1, 2014 2:55 PM0 commentsViews: 71

dhondutai

1 जून : जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचं आज निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. बोरिवलीतल्या राहत्या घरी दुपारी 12 वाजता त्यांचं निधन झालं.

20 जुलै 1927 ला कोल्हापुरात त्यांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्या ऑल इंडिया रेडीओवर गायला लागल्या. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून त्यांची ख्याती होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अल्लादियाँ खाँ साहेबांचे नातू उस्ताद अझिजउद्दीन खाँ यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीच शिक्षण घेतल. त्यापूर्वी त्यांनी लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडे शास्त्रीय संगीताच शिक्षण घेतल होतं.

1990 साली त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. शास्त्रीय संगीतातला इतका मोठा प्रवास केल्यानंतर त्यांना गानयोगिनी या उपाधीनं ओळखलं जायचं.

close