दिल्ली जिंकली आता महाराष्ट्र जिंकणार -उद्धव ठाकरे

June 1, 2014 11:42 PM0 commentsViews: 1735

2Uddhav_jallosh1 जून : लोकसभेत दणदणीत विजयानंतर शिवसेनेनं मुंबईत दिमाखदार असा भव्य ‘जल्लोष’ केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता दिल्ली जिंकली उद्या महाराष्ट्र जिंकून दाखवणार असा विश्वास व्यक्त केला.

 

उद्धव यांनी स्टेजवर नतमस्तक होऊन मतदारांचे आभार मानले. विजयाचा शिल्पकार मी एकटा नसून तुम्ही सगळे आहात, हा विजय एकट्याचा असू शकत नाही, हा विजय तुमचा आहे आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंत्रालयावर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आदेशही उद्धव यांनी कार्यकर्त्यांना दिले.

 

दिल्लीत आपले 18 खासदार गेले असून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणार आणि देशात महाराष्ट्र नंबर 1 चं राज्य करून दाखवणार असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला. तसंच विजय जितका मोठा त्याचा आनंदही तितका मोठा पण विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका अशा कानपिचक्याही उद्धव यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलात सेनेचा ‘जल्लोष’ कार्यक्रम दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या विजयी सर्व 18 खासदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. राज्यभरातून सर्व सेनेचे खासदार, आमदार पदाधिकारी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसंच पार्श्वगायकी वैशाली सामंत, पार्श्वगायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते, अभिजित सावंत यांच्यासह कॉमेडियन कपिल शर्मा यांनीही दमदार हजेरी लावली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close