26 /11 खटल्याच्या सुनावणीला सुरुवात

April 15, 2009 5:43 AM0 commentsViews: 3

15 एप्रिल, मुंबई सुधाकर कांबळे 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरण खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरू होत आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता आर्थर रोड परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी काल आर्थररोड जेलला भेट देऊन सुरक्षाव्यवस्थेची पहाणीही केली. ' दहशतवादी कसाबची सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त केला आहे. आर्थरोड परिसरातल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची व्यवस्था पोलिसांनी घेतली आहे, 'अशी माहिती गृहराज्य मंत्री नसीम खान यांनी दिली.

close