बदायूनंतर बरेलीमध्येही तरुणीवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या

June 2, 2014 5:41 PM0 commentsViews: 3979

mumbai gang rape2 जून : उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिकी अत्याचार करुन त्यांची हत्या केल्यानंतरही राज्य सरकार जागे झालेले दिसत नाही. बदायूंची घटना ताजी असतानाच बरेलीमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर तिला ऍसिड पाजण्याचा प्रयत्न केला. तिला कुणी ओळखू नये म्हणून चेहर्‍यावरही ऍसिड ओतण्यात आलं आणि गळा आवळून तिचा खून करण्यात आला.

दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात बदायू येथे दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांचे मृतदेह झाडावर लटकवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर देशभरातून अखिलेश यादव यांच्या सरकारवर टीका झाली. केंद्र सरकारनेही राज्य सरकारला घेरण्यास सुरवात केली. मात्र, असं असतानाही उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार्‍यांचे राज्य असल्याचे दिसत आहे. आज मुख्यमंत्री अखिलेश यादवांच्या ऑफिससमोर भाजप महिला मोर्चानं जोरदार निदर्शनं केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा फवारा केला. दरम्यान, अटक केलेल्यांपैकी दोन आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिलीय असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close