मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार : शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा तीव्र

June 2, 2014 6:22 PM0 commentsViews: 6431

sanju devu

2 जून :  केंद्रामध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याने आता सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रात काही महिन्यांतच होणार्‍या विधानसभा निवडणुकांकडे वळलेलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीचा फॉर्म्युला गेली अनेक वर्षं ठरलेला आहे. पण आता केंद्रात भाजपनं मुसंडी मारल्याने राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरू झाली आहेत.

राज्यात मुख्यमंत्री हा शिवसेनेचं होईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील,असंही त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार योग्यवेळी ठरवू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागा वाढवून देण्याच्या भाजपच्या मागणीला शिवसेनेचं हे प्रत्युत्तर असल्याचं मानलं जातं आहे.

दरम्यान, राज्यात महायुतीचाच मुख्यमंत्री होईल आणि ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, मुख्यमंत्री त्याचाच होईल, असं मत रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज होतो. पण, मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल, असं आश्वासन एनडीएनं दिल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close