सुरेश कलमाडी यांनी सादर केला 2004चा जुनाच जाहिरनामा

April 15, 2009 7:39 AM0 commentsViews: 20

15 एप्रिललोकसभा निवडणुकीसाठी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी सादर केलेला जाहिरनामा हा 2004 साली सादर केलेल्या जाहिरनाम्याची कॉपी असल्याचा आरोप बसपचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी आणि भाजपाचे उमेदवार आनिल शिरोळे यांनी केला आहे. कलमाडी यांच्या जाहिरनाम्याच्या निमित्ताने विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. पुण्याचे खासदार सुरेश कलमाडींनी जाहीर सभेत शरद पवार यांच्या हस्ते 2009 च्या जाहिरनाम्याचे प्रकाशन करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. झोपडपट्‌टी वासियांना पक्की घरे, दरवर्षी एक लाख तरूणंाना रोजगार, नदीची स्वच्छता, खेळाडूंसाठी स्पोर्ट्स, हॉस्टेल, शहरात शंभर उद्यानांची निर्मिती ,24 तास पाणीपुरवठा ही 2004च्याच जाहिरनाम्यातील आश्वासनं जशीच्या तशी 2009 च्या जाहिरनाम्यात छापल्याचा विरोधकांना आयता मुद्दा चघळायला मिळाला आहे. एकूणच कलमाडींनी जाहिरनाम्याच्या नावाखाली पोकळ आश्वासनं दिली आहेत. राजकारणी निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना कसे बनवतात याचा हा नमुनाच कलमाडींनी प्रसिध्द केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

close