गुन्हेगारांना शासन करणार – वकील उज्ज्वल निकम

April 15, 2009 8:54 AM0 commentsViews: 3

15 एप्रिल, जळगाव मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जखमा या अजूनही ओल्या आहेत. या ओल्या जखमा पुन्हा उलगडायला सुरुवात झाली आहे ती आजपासून सुरू झालेल्या 26/11 च्या खटल्याच्या सुनावणीमुळे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या खटल्याची दखल घेतली जाणार आहे. भारतसरकारकडून हा 26 /11 चा खटला लढवणार आहेत सरकारी वकील उज्ज्वल निकम. त्यानिमित्ताने आयबीएन-लोकमतचे जळगावचे ब्युरोचीफ प्रशांत बाग यांनी उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला. 26/11 आणि कसाबच्या खटल्याची साधारण रूपरेषा काय असणार आहे, याची साधारण कल्पना त्यांनी आयबीएन-लोकमतला दिली. खटल्यात आणि खटल्याची सुनावणी करताना सर्वात आधी कसाब आणि त्याच्या साथीदारांवर काय काय आरोप असणार आहेत, ते सांगितलं जाईल. त्यानंतर लष्कर-ए-तोयबाविरुद्धचे आरोप वाचले जातील. त्यानंतर आरोपींचं म्हणणं ऐकलं जाणार आहे. मगच भारतीय न्यायव्यवस्था त्यावर आपला निर्णय देईल, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या मुलाखतीत दिली. आम्ही गुन्हेगारांना शासन करणार,असंही ते त्यावेळी म्हणाले. उज्ज्वल निकम यांची मुलाखत ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close