ऍडव्हान्स टॅक्सच्या फिल्मी यादीत अक्षय कुमार अव्वल

April 15, 2009 8:57 AM0 commentsViews: 12

15 एप्रिलऍडव्हान्स टॅक्स भरणार्‍या फिल्म स्टार्समध्ये अक्षय कुमारने बाजी मारली आहे. या टॉप टेन लिस्टमध्ये हिमेश रेशमिया अमिताभ बच्चनपेक्षाही आघाडीवर आहे. इन्कम टॅक्स विभागानुसार अक्षय कुमारने 31 कोटी रुपये भरले आहेत. मागच्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 148 टक्क्यांनी जास्त आहे. तर शाहरुखने 30.9 कोटींचा ऍडव्हान्स टॅक्स भरला आहे. सगळ्यात घसरण झालीय ती अमिताभने भरलेल्या टॅक्समध्ये. त्यांनी फक्त सव्वा कोटीचा ऍडव्हान्स टॅक्स भरल्यानं जास्त टॅक्स भरणार्‍या सेलिब्रिटीजच्या लिस्टमध्ये ते दहाव्या क्रमांकावर आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्यानेही अमिताभपेक्षा जास्त टॅक्स भरला आहे. अभिषेकने 3.2 कोटी रुपये, तर ऍशने 4.75 कोटी रुपये ऍडव्हान्स टॅक्स म्हणून भरले आहेत.

close