कसाबची आई मुलाला भेटण्यासाठी भारतात येणार

April 15, 2009 6:24 AM0 commentsViews:

15 एप्रिल 26/11 च्या मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत आरोपी अजमल अमिर कसाब याला भेटण्यासाठी त्याची आई पाकिस्तानातून भारतात येणार आहे. ही माहिती परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली. पाकिस्तानने आता मुंबई हल्ल्यासंदर्भात चालू असलेल्या तपासात भारताला सहकार्य करावं, तसंच कांगावा करू नये, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. सध्या कसाबला कडेकोट बंदोबस्तात मुंबईत आथर रोड तुरूंगात ठेवण्यात आलं आहे.

close