निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिमूर मतदारसंघात कडी सुरक्षा

April 15, 2009 5:19 AM0 commentsViews: 3

15 एप्रिल, चिमूर पहिल्या टप्प्यात राज्यातल्या गडचिरोली-चिमूर या मतदारसंघातही मतदान होतं. नक्षलवादी कारवायांमुळे हा भाग नेहमीच चर्चेत असतो. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळात या मतदारसंघात सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आहे. नक्षलवादी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी यावेळी वायुसेनेची तीन हेलिकॉप्टर्स मागवण्यात आली आहेत. या एकंदर सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पोलिस अधिक्षक आणि नक्षलवादविरोधी पथकानं या भागाचा हवाईदौरा केलाय. याठिकाणी सोळा एप्रिलला सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. या मतदारसंघात 11 लाख मतदार आहेत.

close