राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार शेवटचा अर्थसंकल्प

June 5, 2014 1:44 PM1 commentViews: 2097

ajit pawar budget 405 जून : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेले राज्यातले काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार आज शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने सत्ताधारी आघाडीच्या विरोधात जोरदार कौल दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेचा रोष पत्कारावा लागू नये यासाठी अर्थसंकल्पात भरीव आणि लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडून आघाडी सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे

विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार आपला सलग तिसरा अर्थसंकल्प आज दुपारी दोनच्या सुमारास मांडतील. हाच अर्थसंकल्प विधानपरीषदेत अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक सादर करतील. सुमारे 45 हजार कोटींपेक्षाही जास्त रूपयांचा हा अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा असणार आहेत हे स्पष्ट दिसतं आहे. विविध वस्तुंवरील सवलती कायम ठेवल्या जातील तर सिगारेट, तंबाखु, मादक द्रव्यावरील कर आकारणीत वाढ होण्याची शक्याता आहे. व्यापारी वर्गाची नाराजी बघता विक्रीकरात काही सवलती मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय महानगर पालिकेतील एलबीटी रद्द करण्यासंदर्भात आणि त्या बदल्यात वॅट वर सरचार्ज आकारणी संदर्भात राज्य सरकार कोणती भूमिका मांडते आहे याकडे व्याप्यारांचे लक्ष लागले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SAMEER

    तुम्हाला निवडून देण्यात आता काहीही ” अर्थ ” नाही, आणि मनाशी आम्ही केलेला एकच ” संकल्प ” म्हणजेच तुम्हाला कायमच घरी बसवन हाच आमचा ” अर्थसंकल्प ” आहे . धन्यवाद !

close