मोहसीन शेख हत्येप्रकरणी: हिंदू राष्ट्र सेनेच्या आणखी 6 जणांना अटक

June 5, 2014 6:15 PM3 commentsViews: 4425

05 जून :  unnamed पोलीस आता उरलेल्या संशयितांच्या शोधात आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी सोमवारी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीनला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. मूळचा सोलापूरचा 24 वर्षांचा मोहसीन हा आयटी क्षेत्रात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. सोमवारी तो मित्रासह नमाज पढून परत येत असताना या जमावानं त्याला गाठलं आणि मारहाण केली. याप्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्रालयानं महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला आहे.

मोहसीन शेख मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्या हत्येनं त्याच्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. ‘आमच्या मुलाचा नाहक बळी गेला असून मारेकर्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे’ अशी मंागणी मोहसिनच्या वडिलांनी केली आहे. त्याचं बरोबर फेसबुक पोस्टच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. काही खोडसाळ लोक या देशाचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहतायेत. त्यामुळे निष्पापांचा बळी जातो आ लोकांची दिशाभूल करणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशीही मागणी मोहसिनच्या वडिलांनी केली आहे.

दरम्यान, कायदा हातात घेणार्‍यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर अशा पद्धतीने लाकांच्या भावना भडकावणारे मजकूर फेसबुकवर टाकणार्‍यांविरोधातही सरकारन कारवाई करावी असं ते म्हणाले. तर या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच हिंदू राष्ट्र सेनेच्या इतरही कारवायांचा तपास करणार, अशी माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली.

कोण आहे धनंजय देसाई ?

  • हिंदू राष्ट्र सेना या मूलतत्ववादी संघटनेचा संस्थापक
  • 2007 मध्ये स्टार टीव्हीवरच्या हल्ल्यानंतर ही संघटना प्रकाशात
  • हिंदू युवतीनं मुस्लीम युवकाशी पळून जाऊन लग्न केल्याचं वृत्त दाखवल्याचा केला होता निषेध
  • धनंजय देसाईविरोधात आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 25 गुन्हे दाखल
  • यामध्ये दंगलीसंदर्भातल्या गुन्ह्यांचाही समावेश
  • मार्च 2014 मध्ये हडपसर पोलिसांनी धनंजय देसाईला शांतता भंग न करण्याची बजावली होती नोटीस

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • amit

    जेवढ्या तत्परतेने ह्या केस मधील गुन्हेगारांचा शोध पोलिस घेत आहेत त्याच तत्परतेने आमच्या राजांचा अपमान करणार्याचा शोध सरकार आणि पोलिस घेईल का ?

  • Shankar Bhor

    जर महाराष्ट्र सरकारने वेळीच जाहीर केले असते कि छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमानास्पद फोटो टाकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध सरकार लवकरच कारवाई करेल जनतेने शांत राहावे तर एका तरुणाला जीव गमवायला लागला नसता फोटो अपलोड झाल्यानंतर मिडिया व सरकार उदासीन राहिल्याने जनतेच्या संतापात भर पडली

  • Raj Nikam

    जेवढ्या तत्परतेने ह्या केस मधील गुन्हेगारांचा शोध पोलिस घेत आहेत त्याच तत्परतेने आमच्या राजांचा अपमान करणार्याचा शोध सरकार आणि पोलिस घेईल का ?

close