टाकाऊपासून टिकाऊ करणारे अनोखे किमयागार

June 5, 2014 12:52 PM2 commentsViews: 1267

हलीमा कुरेशी, पुणे.

04 जून :  हि आहे एक अनोखी शाळा. या शाळेचं नाव आहे उत्तरा पर्यावरण शाळा. लोणावळ्याजवळ वाकसाई गावात टाकाऊतून टिकाऊचं प्रशिक्षण देणारी ही आगळीवेगळी शाळा सुरु केली सर्पतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी निलीमकुमार खैरे यांनी. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही भेट दिली याचं अनोख्या शाळेला.

उत्तरा पर्यावरण शाळेच्या फाटकातून आपण प्रवेश करतो आणि डोळ्यांवर विश्वास बसत नाही. टाकाऊ टायरपासून बनवलेली आलिशान आरामखुर्ची आपलं लक्ष वेधून घेते. तीन हजार वाया गेलेल्या सीडींपासून ही खुर्ची बनवण्यात आली आहे. डोअरमॅटही प्लास्टिक बॉटलच्या झाकणांपासून बनवण्यात आल्या आहेत. वाया गेलेले प्लास्टिकच्या चहाच्या कपांचे झुंबर. प्लास्टिक बॉटलची बोट. प्लास्टिक डब्ब्यांचा खुबीने वापर करुन बनवलेला वॉटर फॉल. अशा अनेक वस्तू. टाकाऊ झालेल्या पाण्याची झारिने तर बाथरुममध्ये चक्क शॉवरची जागा घेतली आहे. लाकडी ओंडक्यात वॉशबेसिन विराजमान आहेत. या सगळ्या वस्तूंचे किमयागार आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ निलीमकुमार खैरे.

ड्रेनेज पाईपमध्ये वाकुल्या दाखवत बहरलेली झाडे. पाणी शुद्धीकरणासाठी बनवलेली सायकल, 5 लिटरच्या टाकाउ कॅनपासून बनवलेली वॉशिंग मशिन, एवढंच नाही तर पवनचक्कीदेखील. प्लास्टिक पुनर्वापराचा प्रकल्प जन्माला येण्याची कहाणीही तशी वेगळीचं आहे.

उत्तरा पर्यावरण शाळेत प्रवेशासाठी कुठलीही फी नाही. पण एक अट आहे. टाकाऊ प्लास्टीक, काचेचा पुर्नवापर करायचा. इथे वाया गेलेल्या बुटांपासून पक्षांची घरटी बनवली जातात. अशा अनेक वस्तूंचं प्रशिक्षण इथे दिलं जातं. ही शाळा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षकांसाठीही आहे. गेली तीन वर्ष पर्यावरण रक्षणाचा खराखुरा कानमंत्र या शाळेत दिला जातोय. पर्यावरण हा 100 गुणांचा विषय नाही तर 100 टक्के जगण्यासाठीचा विषय आहे, हेच निलीमकुमार खैरे या शाळेतून सांगू पाहतायत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • KISHOR GORE

    good article mentioning this unique school where the sole aim is provide education in environment conservation and sustainable development. No wonder that a renown naturalist from Pune, Neelamkumar Khaire is the brain behind it. Great work! needs to followed by many others!

  • Gangadhar Sherla

    Sir. I really impressed, I wd like 2 visit.

close