सुवर्णमंदिरात अकाली दलाचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी

June 6, 2014 2:02 PM0 commentsViews: 3755

goloden temple clas

06 जून : सुवर्णमंदिरामध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला आज 30 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृतसरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शीख नेत्यांला बोलू न दिल्याने सुवर्णमंदिरातच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तलवारी उपसण्यापर्यंत हा प्रकार गेला. याप्रकरणी 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ऑपरेशन ब्लू स्टारला 30 वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमात भाषण कोण करणार या वरुन सुवर्णमंदिराचं सुरक्षा दल आणि शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजीत सिंग मान यांचे समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत अनेकजण जखमी झाले आहेत. तलवारी उपसून धावणारे काही जण आणि तिथून पळण्याच्या प्रयत्नात असलेले इतर भाविक यामुळे काही काळ सुवर्णमंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सध्या इथली सगळी परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

दरम्यान, सुवर्णमंदिर सारख्या पवित्र जागेवर हिंसक घटना घडणे निंदनीय असल्याची प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त होत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close