बिहारच्या रोहतास बीएसएफ कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला

April 15, 2009 5:29 AM0 commentsViews: 5

15 एप्रिल बिहारच्या रोहतास बीएसएफ कॅम्पवर काल मध्यरात्री 100 नक्षलवाद्यांनी रॉकेट लाँचरच्या सहाय्यानं हल्ला केला. या हल्ल्याला बीएसएफच्या जवानांनी गोळीबारानं चोख उत्तर दिलं. नक्षलवादी आणि बीएसएफ जवान यांच्यातली चकमक आत पहाटेपर्यंत चालू होती. मात्र या चकमकीत झालेली प्राणहानी कळू शकलेली नाही. रोहतास हा जिल्हा नक्षलवादी प्रभावीत जिल्हा समजला जातो. पहिल्या टप्याच्या मतदानाला एक दिवस शिल्लक असतांना नक्षलवाद्यांच्या या हल्यानं प्रशासनापुढे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण केलाय. दोनच दिवसांपूर्वी ओरिसामध्ये नक्षलवाद्यांनी नाल्को खाणीवर मोठा हल्ला चढवला होता. दरम्यान केंद्र सरकारने हवाई दलाची मदत घेण्याची तयारी सुरु केलीय. रोहतास किल्ल्याजवळच्या कैमूर डोंगरा जवळ हा कॅम्प आहे. पोलीस अधिक्षकांनी हा हल्ला मोठा सांगत सध्या तरी जखमी बाबत माहिती देणं शक्य नसल्याचं सांगितलंय.

close