मराठा आरक्षणासाठी भुजबळ प्रयत्न करणार

April 15, 2009 6:39 AM0 commentsViews: 6

15 एप्रिल, नाशिक मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ स्वत: प्रयत्न करणार आहेत. तसं आश्वासन छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत मराठा समाजाला दिलं तसंच स्वत:ची भूमिकाही जाहीर केली. ' माझी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका मी एक मार्चला आणि त्याआधीही पंधरा ऑक्टोबरला सांगितली होती. मी स्वत: त्यासाठी प्रयत्न करणार आहेत, असं भुजबळ त्या पत्रकार परिषदेत म्हणाले. ' ऐन निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळांना मराठा आरक्षणासाठीचा मुद्दा आठवण्याचं कारण म्हणजे समीर भुजबळ. नाशिक लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि जातीय प्रचारानं त्रस्त केलं होतं. पण उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्याबाबत पुढाकार घेतला. नाशिक जिल्ह्यातल्या मराठा महासंघ, शिवसंग्राम, छावा आणि मराठा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांशी त्यांनी दोन तास चर्चा केली आणि जिल्ह्यातल्या मराठा समन्वय समितीच्या प्रमुखांकडून "ना विरोध , ना समर्थन" अशी तटस्थता मान्य करवून घेतली. तर छगन भुजबळांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी स्वत: प्रयत्न करेन असे आश्वासनही दिलं.संयुक्त पत्रकार परिषदेत हि भूमिका जाहीर करण्यात आली.

close