मेट्रोचं उद्घाटन करण्याची भाजपला घाई

June 6, 2014 8:59 PM1 commentViews: 3446

metro

06  जून : मेट्रोला लागणारी सर्व प्रमाणपत्र आता मिळाली असली तरी काँग्रेस सरकार मेट्रो सुरू करण्यास मुद्दाम उशीर करत असल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे उद्या मेट्रो ट्रेननं बळजबरी प्रवास करण्याचा निर्णय या खासदारांनी घेतला आहे. लवकरच मुंबईतली पहिली मेट्रो ट्रेन मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे. पण मेट्रोचं श्रेय कोण घेणार या वरुन आता नवीन गदारोळ सुरू झाला आहे. मुंबई मेट्रोच्या घाटकोपर ते वर्साेवा या टप्प्याला रेल्वे बोर्डाने काल हिरवा कंदील दिला. गेल्या तीन महिन्यांपासून ही फाईल रेल्वे बोर्डाकडे पडून होती. खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांना भेटुन मुंबई मेट्रो रेल्वेला आवश्यक असलेली मंजुरी मिळवली.

मेट्रो प्रकल्प हा आघाडी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यामुळे या प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केंद्रातल्या आघाडी सरकारनंतर आता राज्यातलं सरकारही घेऊ पाहात आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत केंद्र सरकारचा महत्त्वाचा वाटा आहे आणि आता केंद्रात सरकार बदलल्यानंतर भाजपचं सरकार आलं आहे. त्यामुळे मेट्रोच्या उद्घाटनाला केंद्रीय वाहातूक मंत्री नितीन गडकरी यांना विशेष अतिथी म्हणून बोलावण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

मेट्रो रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असणार आहेत. यात प्रवाशांसाठी फूड स्टॉल्स, तसंच एटीएमची व्यवस्था असणार आहे. मुंबईतल्या सर्व 12 मेट्रो रेल्वे स्टेशनवर ही व्यवस्था असेल

मुंबई मेट्रो वनची वैशिष्ट्यं

  • वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणार
  • मेट्रो रेल्वेची लांबी 11 किलोमीटर
  • मेट्रो मार्गावर 12 स्टेशन्स
  • वातानुकूलित रेल्वे प्रवास
  • मेट्रो रेल्वे प्रकल्पाची किंमत 2356 कोटी
  • पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shailesh

    What a third class reporting. Metro should have been started atleast 10 to 15 years ago if we compare with other world class cities. They are starting it in 2014! When somebody demands for it to happen faster, you publish a news aginst them. Its because of congress that it has already taken so long…you should support if someone demands to make it happen faster!

close