शरीफ यांच्यातर्फे मोदींच्या आईसाठी साडीचा नजराणा

June 7, 2014 12:07 PM0 commentsViews: 433

hira sadi

07  जून : नवाझ शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यातले वैयक्तिक संबंध आणखी दृढ होताना सध्या दिसत आहेत. ‘अतिथी देवो भव’.अशी भारताची आजवरची परंपरा आहे. हीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर सांभाळली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळयासाठी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आमंत्रीत केले होते. तेव्हा त्यांच्यासोबत जातांना मोदीं यांनी नवाज शरीफ यांच्या आईसाठी शाल पाठविली होती.

याच परंपरेचे पालन पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केले आहे. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला गेल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईसाठी पांढरी साडी पाठविली आहे. पांढरा रंग हा शांततेचा मानला जातो. ही साडी पाठवून जणुकाही या दोन्ही देशात शांतता पाळण्याचे संकेत दिले आहे. ही साडी आपण आपल्या आईला नक्की देऊ असे वचन नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दिले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close