नारायण राणेंनी डागली सेनेवर तोफ

April 15, 2009 7:44 AM0 commentsViews: 7

15 एप्रिल, औरंगाबाद नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत गैरहजर राहणारे शिवसेनेचे नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांना शिवसैनिकांकडून मारहाण झाली होती. त्यांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे औरंगाबाद मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सेनेच्या मुजोर वागण्याचा समाचार घेतला. जाळपोळ करणं, मारहाण तसंच गुंडागर्दी करून दंगल माजवणंआणि आपली राजकीय पोळी भाजून घेणं ही शिवसेनेची संस्कृती असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी औरंगाबादमध्ये केला.

close