विदर्भात उन्हाचा कहर, उष्माघातानं आतापर्यंत 12 बळी

June 7, 2014 1:46 PM0 commentsViews: 1978

summer-heat07  जून :  मृग नक्षत्र सुरु झाले असले तरी विदर्भातील तापमान कमी होण्याएवजी वाढतच आहे. चंद्रपुरमध्ये 47.7 एवढे तापमान पोहचले असून गेल्या अकरा वर्षापुर्वीच्या 47.7 सेल्सिअसचा विक्रम मोडला आहे. विदर्भात उष्माघातामुळे गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नागपूर शहरात 8 तर अमरावती जिल्ह्यात 4 जणांचा समावेश आहे. नागपूर पोलिसांनी आठही जणांचे मृत्यू हे उष्माघाताने झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून पोस्टमॉर्टमसाठी आठही मृतदेह पाठवण्यात आले आहे. तर अमरावती जिल्ह्यातील मृत चौघांपैकी दोघांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये शेतमजूर, कामगार, रिक्षाचालकाचा समावेश आहे.

दरम्यान, विदर्भात पारा 40 अंशांच्या वर आहे. याची झळ पशूपक्षांनाही बसली आहे. त्याकरताच नागपुरात महाराज बाग उद्यानात सर्व पशुपक्षांचं उष्णतेपासून रक्षण व्हावं यासाठी कुलर लावण्यात आलेत.

उष्माघात झाल्यास काय कराल?

 • उष्माघात झालेल्या रुग्णाला हवेशीर ठिकाणी ठेवावे
 • खिडक्या, दरवाजे उघडावे, पंखा अथवा कुलर सुरु करावा
 • अंगावरचे कपडे सैल करावेत
 • रुग्णाला गार पाण्यानं आंघोळ घालावी
 • रुग्णाच्या कपाळावर बर्फगार पाण्याच्या पट्‌ट्या ठेवाव्या
 • जास्त त्रास होत असल्यास लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात हलवावे

उष्माघात टाळण्यासाठी…

 • भर उन्हात दुपारी 11 ते 3.30 दरम्यान बाहेर जाणं, अंगमेहनत करणं टाळावं
 • अंगाशी घट्ट बसणारे, तसंच नॉयलॉनचे कपडे घालणं टाळावं
 • सुती, फिक्या रंगाचे कपडे घालावेत
 • गडद अथवा काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळावं
 • भरपूर पाणी प्यावं, बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
 • उघड्यावरचे पदार्थ, बर्फगोळा, कोल्ड्रिंक्स टाळावेत
 • त्याऐवजी पन्हं, लिंबूसरबत, थंड दूत, कोकम सरबत, उसाचा रस, आवळा सरबत प्यावं
 • भरपूर पाणी असलेली फळं खावी, काकडी, कलिंगड, पपई, टरबूज रोजच्या आहारात घ्यावे
 • उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ यांचा न विसरता वापर करावा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close