मागचं विसरून आम्ही आता पुढे गेलोय- योगेंद्र यादव

June 7, 2014 4:51 PM0 commentsViews: 711

aap meet

07  जून : आम आदमी पक्षाची आज सलग दुसर्‍या दिवशी दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीत पक्षातले मतभेद मिटवण्यासाठी अरविंद केजरीवाल प्रयत्न केले. मी काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर चर्चा झाली आणि मागचं विसरून आम्ही आता पुढे गेलो आहोत, असं आपचे नेते योगेंद्र यादव बैठकीनंतर म्हणाले. उद्याही आम्ही काही मुद्द्यांवर चर्चा करू आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल पुढची दिशा सांगतील, असंही यादव म्हणाले. पण आजच्या बैठकीला कुमार विश्वास यांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना तोंड फुटलं आहे योगेंद्र यादव अजूनही पक्षात असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. आज सकाळी केजरीवाल यांनी योगेंद्र यादव जवळचे मित्र असल्याचं ट्विट केलं होतं. मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांच्यातलं पत्रयुद्ध जगजाहीर झाल्याने आणि हा वाद विकोपाला गेल्याने अखेर दोघांना शांत करण्याचं काम केजरीवाल करत आहेत.

केजरीवालांचं ट्विट
योगेंद्र यादव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर काम करावं लागेल, जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्याविषयी मी त्यांच्याशी चर्चा केलीय.

close