मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन

June 8, 2014 12:02 PM0 commentsViews: 1463

metro new

08  जून :  गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईकर चातकासारखी वाट पाहत असलेल्या ‘मुंबई मेट्रो‘चे आज अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवल. आता वर्सोवा ते घाटकोपर व्हाया अंधेरी हा प्रवास मुंबईकरांना अवघ्या 21 मिनिटांमध्ये करता येणार आहे.

औपचारिक उद्घाटनानंतर वर्सोवा स्टेशनहून मेट्रो घाटकोपर पर्यंत धावली. मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील वर्सोवा ते घाटकोपर असा प्रवास केला आहे. 11 किलोमीटर मेट्रो प्रवासाच्या तिकीट दरावरुन राज्य सरकार आणि रिलायन्स यांच्यात वाद असल्याचे शनिवारी समोर आले होते. मुख्यमंत्र्यांनी निविदेतीलच दर कायम ठेवावे असा पवित्रा घेतला होता, तर रिलायन्सने 10 ते 40 रुपये दर आकारण्याचे निश्चित केले आहे.  दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या मेट्रोचे दर प्रारंभीचा एक महिना केवळ 10 रुपये असणार आहे. एक महिन्यानंतर रिलायन्स कोणते दर आकारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, दहिसर ते बोरिवली ‘मेट्रो 2′ लवकरच सुरु करु, असा विश्वास भाजपचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close