पद्म पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात धोणी-भज्जीची अनुपस्थीती : देशभरात उमटले तीव्र पडसाद

April 15, 2009 3:59 PM0 commentsViews: 8

15 एप्रिलमंगळवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते दुसर्‍या टप्प्यातील पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं.यावेळी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणी आणि स्पिनर हरभजन सिंग यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार होतं. पण हे दोघं भारतात असूनही या मानाच्या सोहळ्यासाठी गैरहजर राहीले. कारण होतं ते ऍड फिल्मच्या शूटचं. कॅप्टन महेंद्र सिंग धोणी एका जाहीरातीच्या शूटमध्ये व्यस्त होता तर हरभजन सिंग त्याच्या कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त होता. त्यांच्या या अनुपस्थितीच्या तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटल्यात. त्यामुळे या दोघांच्या बचावासाठी बीसीसीआयला पुढे यावं लागल आहे. पुरस्काराचा अपमान करण्याचा या दोघांचा कोणताही हेतू नसल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं आहे.

close