मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

June 10, 2014 10:07 PM0 commentsViews: 648

lokmat

10 जून :   मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर झाली आहे. दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर झाड कोसळल्यानं सीएसटीकडे जाणार्‍या गाड्या खोळंबल्या होती. अप फास्ट ट्रॅकवरची वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली होती. सीएसटीकडे जाणार्‍या गाड्याच खोळंबल्यामुळे सीएसटीवरून सुटणार्‍या गाड्यांवर परिणाम झाला होता. कर्जत, खोपोली आणि कसार्‍याला जाणार्‍या प्रवाशांचे अशा वेळी सर्वात जास्त हाल होतात कारण या ठिकाणांना जाण्यासाठी गाड्याच मुळात कमी आहेत. सीएसटीवर सध्या प्रवाशांची गर्दी जमलीय आणि येणार्‍या प्रत्येक गाडीत शिरण्यासाठी कसरत करावी लागतेय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close