पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू

April 16, 2009 5:48 AM0 commentsViews: 4

16 एप्रिल देशातील 15 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 124 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात महाराष्ट्रातल्या 13 मतदासंघांचा समावेश आहे. आजच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 13 मतदासंघांचं आणि त्या मतदारसंघांतून उभ्या राहिलेल्या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. आजच्या पहिल्या टप्प्यांतल्या मतदानाला सुरुवात होऊन चार तास झाले आहेत. बहुतेक मतदारसंघांतल्या मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते संध्याकाळी 5.00 अशी आहे. तर नक्षलग्रस्त भागातल्या मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 अशी आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, भारतीय जनता पक्षाचे नेते मुरली मनोहर जोशी, तेलंगणा राष्ट्रीय समितीचे प्रमुख के.चंद्रशेखर, काँग्रेसच्या रेणुका चौधरी आणि शशी थरूर, माजी केंद्रीय मंत्री बी. दत्तात्रय, अभिनेत्री विजयाशांती, एन.टी. रामाराव यांची कन्या डी. पुंदेश्वरी, राष्ट्रवादीचे केंद्रीय वाहतुकमंत्री प्रफुल्ल पटेल, केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेवार, सूर्यकांता पाटील, काँग्रेसचे दत्ता मेघे, शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ, राज्याचे कृषी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे खासदार शिशुपाल पटले, काँग्रेसचे माजी आमदार नाना पाटोले, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, रिपाईंचे राजेंद्र गवई, काँग्रसेचे हरिभाऊ राठोड , शिवसेनेच्या भावना गवळी यांचं भवितव्य आज ठरणार आहे.

close