मोदींचं व्हायब्रंट गुजरात मॉडेल आता राष्ट्रीय पातळीवर

June 11, 2014 9:57 AM0 commentsViews: 1642

modi11  जून :  व्हायब्रंट गुजरात मॉडेल आता राष्ट्रपातळीवर राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्यात गुंतवणूक वाढीसाठी ‘व्हायब्रंट गुजरात’ ही संकल्पना मांडली. मोदी तीच संकल्पना आता राष्ट्रीय पातळीवर राबवणार आहेत. ‘व्हायब्रंट इंडिया ग्लोबल इन्वेस्टर समीट’ असं या परिषदेचं नाव असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परिषद होण्याची शक्यता आहे. जगभरातल्या उद्योगपतींना या परिषदेसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काही अभ्यास दौरेही काढण्यात आलेत.

वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेलं एकमेव राज्य म्हणजे गुजरात. गुजरातच्या या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातल्या एका उच्चस्तरीय पथकाने नुकतीच गुजरातला भेट दिली. कधीकाळी दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा तोटा असलेलं गुजरात इलेक्ट्रीसिटी बोर्ड आज 500 कोटी रुपये नफ्यात आहे.

ऊर्जाच नाही तर गुजरातमध्ये यशस्वी झालेल्या अनेक योजना राष्ट्रीय पातळीवर राबवण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. सूरतमध्ये गुजरात सरकारनं पब्लिक प्रायव्हट पार्टनरशिन (पीपीपी) तत्त्वावर सीसीटीव्ही सुरक्षा योजना राबवली. या योजनेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं एक पथकही सूरतला जाणार आहे.

 सूरत सीसीटीव्ही सुरक्षा योजना, कशी आहे ही योजना बघा
– पोलिसांनी सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळांवर हाय डेफिनेशन कॅमेरे बसवलेत
– वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना तात्काळ चालान पाठवण्यासाठी पोलीस यंत्रणा RTO आणि बँकांशी संलग्न आहे.

इतकंच नाही तर यमुना स्वच्छतेसाठी अधिकार्‍यांच्या एका पथकानं नुकतीच साबरमती नदी विकास योजनेचीही पाहणी केली आहे.

 सूरत सीसीटीव्ही सुरक्षा योजना
– सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळांवर हाय डेफिनेशन कॅमेरे
– चालान पाठवण्यासाठी पोलीस यंत्रणा RTO आणि बँकांशी संलग्न

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close