नक्षलीपट्‌ट्यात मतदानासाठी कडक सुरक्षा

April 16, 2009 6:32 AM0 commentsViews: 4

16 एप्रिल15 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशातल्या नक्षली पट्‌ट्यात मतदान होत असल्यामुळे कडक सुरक्षा ठेवण्यात आलीये. निवडणूक प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्यासाठी सकाळपासूनच नक्षलवाद्यांनी बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगडच्या अनेक मतदान केंद्रांवर हल्ले चढवलेत. तर राज्यात अमरावती, अकोला, नागपूर, हिंगोली, परभणी, नांदेड यासह मराठवाड्यातल्या तीन आणि विदर्भातल्या दहा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झालीय. अमरावतीत 5 टक्के मतदान झालंय. तर नागपूरमध्ये मतदानासाठी तरुणांनी मोठ्या संख्येनं रांगा लावल्या आहेत. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, जम्मू आणि काश्मीर, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओरिसा, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, अंदमान आणि निकोबार तसंच लक्षद्वीप या 17 राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होतंय. 124 मतदारसंघातून 1 हजार 715 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगानं 23 हजार गावं आणि वस्त्या संवेदनशील म्हणून घोषित केलेत. या सर्व ठिकाणी सुरक्षेच्या कडक उपाययोजना करण्यात आल्यात. राज्याच्या पोलिसांसह लष्कर, निमलष्करी दल आणि सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. आसामला सर्वाधिक धोका आहे. त्याठिकाणी राज्य पोलिसांच्या 41 कंपन्या, सीआरपीएफच्या 2 तुकड्या, लष्कराच्या 20 तुकड्या आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्यातुकड्या तैनात करण्यात आल्यात. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी 122 महिला उमेदवार उभ्या आहेत. तर पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी 85 लाख मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलीये. 14 कोटी 31 लाखांपोक्षा जास्त मतदार आपला हक्क बजावणारेयत 3 लाखांपेक्षा जास्त व्होटींग मशिनचा मतदानासाठी वापर होणार आहे. 9 लाख निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत.

close