हिंगोलीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

April 16, 2009 7:01 AM0 commentsViews: 6

16 एप्रिल, हिंगोलीसंतोष पवारमतदानाला गालाबोट लागणं ही गोष्ट काही नवीन नाही. हिंगोलीजवळच्या बाभूळगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात शिवसैनिकांनी मतदान यंत्राची तोडफोड केली. या प्रकरणात चार शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हिंगोलीच्या कलेक्टर विनिता सिंघल यांनी आयबीएन लोकमतला ही माहिती दिली. मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन मतदारसंघांमध्ये कडोकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. इथे पहिल्या टप्प्यात 2 कोटी मतदार आहेत आणि 23 हजार 461 मतदानकेंद्रं आहेत. मतदान सुरळीतपणे पार पडावं म्हणून निवडणूक अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची फौज प्रयत्न करत आहे.

close