आबांची पलटी, मी ‘तसं’ काही बोललोच नाही !

June 11, 2014 5:59 PM0 commentsViews: 3304

rr patilll11 जून : ‘प्रत्येक घरात जर पोलीस दिले तरी महिलांवरील अत्याचार रोखणे अशक्य आहे’ असं खळबळजनक व्यक्तव्य करणारे राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आता घूमजाव केलंय.आपण असं काही बोललोच नाही. राज्यात बलात्काराच्या घटना ज्या घडत आहेत त्याबद्दल आपण माहिती दिली होती पण आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असा खुलास आबांनी केला.

महिलांवरच्या वाढत्या अत्याचारासंदर्भात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानपरिषदेत निवेदन सादर केलं. त्यावेळी त्यांनी प्रत्येक घरात जर पोलीस दिले तरी महिलांवरील अत्याचार रोखणे अशक्य आहे. तसंच नैतिक घसरणीमुळेच महिलांवरच्या अत्याचारांत वाढ होत असल्याचं म्हटलंय. महिलांवरच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहितीही दिली.

पण त्यांच्या हतबलतेमुळे आणि धक्कादायक विधानामुळे त्यांच्यावर विरोधाकांनी एकच टीका केली. राज्याचे गृहमंत्री हे ह.भ.प. सारखे दिसले अशी बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी नेते विनोद तावडे यांनी केली तर महिलांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांनी असं विधान करुन अपेक्षाभंग केला अशी प्रतिक्रिया सेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी दिली. चौहीबाजूने टीकेमुळे आबांनी माध्यमांकडे खुलासा करत आपल्या विधानावर पलटी मारली.

 आर आर पाटील यांनी विधानपरिषदेत नेमकं काय म्हटलंय ?

  • - प्रत्येत घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत
  • - नैतिक घसरणीमुळे महिला अत्याचारात वाढ
  • - इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी अत्याचार
  • - चंद्रपूर, नांदेड, भंडारा इथल्या फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायाधीशांची नेमणूक
  • - पीडित महिला मागेल तो वकील
  • - अत्याचार रोखण्यासाठी 500 नवीन वाहनं घेणार
  • - सोनसाखळी चोर्‍यांच प्रमाण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
  • - मुंबईत 200 महिला कंमांडो पथक महिन्याभरात नेमण्यासारखे निर्णय घेतला

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close