राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ‘सामना’च्या कार्यालयाबाहेर राडा

June 11, 2014 6:49 PM0 commentsViews: 6247

24ncp_samana11 जून : शरद पवार हे पाकिस्तानच्या सईद हाफिज सारखं बरळू लागले अशी टीका शिवसेनेनं आपल्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून केली. सेनेच्या टीकेमुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या कार्यालयावर धाव घेतली. सेनेच्या टीकेचा याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतील सामना कार्यालयाजवळ येत असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली या बाचाबाचीमुळे परिसरात काळ तणावाचं वातावरण होतं. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस फाटा आहे आणि शिवसैनिकांनी परिसरात गर्दी केली आहे.

मागील आठवड्यात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यावरुन राज्यात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या संशयावरुन पुण्यात मोहसीन शेख या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार आल्यावर अशा प्रकारच्या शक्ती डोकं वर काढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. पवारांच्या ह्या वक्तव्याचा समाचार आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखात घेण्यात आला होता.

 

शरद पवार हे हाफिज सईदसारखे बरळत आहेत. पराभवामुळे पवारांचं ताळतंत्र सुटला आहे. मोहसिनची हत्या आणि मोदी सरकारचा काय संबंध ? महाराष्ट्रात आघाडीचं सरकार असताना ही घटना घडली. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. मारेकर्‍यांना अजूनही अटक नाही, त्यांना आधी पकडा. शरद पवार तुष्टीकरणासाठी असं बोलत आहेत अशी टीका सामनातून करण्यात आली. तसंच आघाडीचे सरकार यांचेच असून गृहमंत्रीही यांच्याच पक्षाचा आहे तरी सुद्धा एका निष्पाप तरुणाची हत्या झाली हे आघाडी सरकारचे अपयश आहे असं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. सेनेच्या या टीकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संताप व्यक्त केला असून सामनाच्या कार्यलयाबाहेर निषेध नोंदवण्यासाठी धाव घेतलीय.सध्या परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस फाटा आहे आणि शिवसैनिकांनी परिसरात गर्दी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close