पोलीस भरतीत एका तरुणाचा मृत्यू

June 11, 2014 5:18 PM0 commentsViews: 3086

police_bharti11 जून : पोलीस होण्याचं स्वप्न एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची दुर्देवी घटना मुंबईत घडलीय. मुंबईतील विक्रोळी भागात पोलीस भरतीदरम्यान अंबादास सोनावणे या तरुणाचा मृत्यू झाला. अंबादास नाशिकमधल्या मालेगावचा रहिवासी होता.

भरती परीक्षेदरम्यान धावताना अंबादास कोसळला. त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कडाक्याच्या उन्हात धावल्यामुळे उष्माघातानं त्याचा मृत्यू झालाय. दरवर्षी पोलीस भरती दरम्यान, असा गोंधळ होतो आणि त्यावर टीका होते मात्र त्यात अजून कुठल्याही सुधारणा केल्या जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

भरती दरम्यान शारीरिक इजा झाल्यास आम्ही जबाबदार नाही !
 

दरम्यान, पोलीस भरतीदरम्यान कुणाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी आपली नाही, असे पोस्टर्स पोलीस खात्यानं लावले आहेत. पोलिसांची असंवेदनशीलता इथेच संपत नाही. पोलीस भरतीचं स्वप्न घेऊन आलेल्या या तरुणांना प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागतं. ठाण्यात पोलीस परेड मैदानात तरुणांना रस्त्यावरच ठाणं मांडावे लागले. रखरखत्या उन्हात परीक्षा देणार्‍या या तरुणांच्या खाण्या-पिण्यासाठीसुद्धा कुठलीच सोय करण्यात आलेली नाही. फूटपाथवर त्यांना झोपावं लागतं. पोलीस विभागानं मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close