कटनीमध्ये अडवाणींवर फेकली चप्पल

April 16, 2009 9:04 AM0 commentsViews: 6

16 एप्रिल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्यावर एका प्रचारसभेदरम्यान चप्पल फेकण्यात आली. मध्यप्रदेशमधील कटनी इथे ही प्रचारसभा सुरू होती. महत्त्वाचं म्हणजे चप्पल फेकणारा कार्यकर्ता भाजपचा असून पावस अग्रवाल असं त्याचं नाव आहे. सभा सुरू असताना अचानक पारसअग्रवालनं लाकडाची चप्पल अडवाणींवर भिरकावली. पण अडवाणींच्या दिशेने भिरकावलेली चप्पल त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाहीये. पारस अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अगोदर केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांच्यावर पत्रकार जर्नेल सिंग यांनी बूट फेकून मारला होता. तर हरयाणा इथे प्रचारसभेत काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्यावर एका निवृत्त शिक्षकानं चप्पल फेकून मारली होती. मात्र या दोन्ही काँग्रेस नेत्यांनी चप्पल फेकणार्‍यांना माफ केलं होतं.

close