मोहसीन शेख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार

June 11, 2014 9:17 PM0 commentsViews: 1741

Image ujaval_nikam_300x255.jpg11 जून : मोहसीन शेख हत्याप्रकरणाचा खटला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवणार आहेत. मोहसीनचे वडील सादीक शेख यांनी निकमांच्या नेमणुकीची मागणी केली होती. आज (बुधवारी) मुख्यमंत्र्यांनी निकमांशी या मुद्द्यावर चर्चा केली.

 

उज्ज्वल निकमांनी खटला लढवण्यासाठी होकार कळवला. यासंदर्भात मोहसीनच्या वडिलांनी मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती.

 

दरम्यान, मोहसीनच्या हत्येप्रकरणी कालच हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक करण्यात आली असून धनंजय देसाईला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट झालेल्या कॉम्प्युटरचा आयपी ऍड्रेस बनावट निघाल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close