ब्राझीलमध्ये फुटबॉल ‘उत्सवा’ला उद्या सुरुवात

June 11, 2014 9:30 PM0 commentsViews: 658

2014brazil_fifa201411 जून : ब्राझीलमध्ये उद्या(गुरुवार)पासून फिफा वर्ल्ड कपची धूम रंगणार आहे. 12 जून ते 13 जुलैपर्यंत 32 टीम्समध्ये वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी महायुद्ध रंगणार आहे. 32 टीम्स 64 मॅचमध्ये एकमेकांना भिडतील. ब्राझीलच्या एकूण 12 शहरांमध्ये हा वर्ल्ड कप खेळवला जाईल. जगातल्या सगळ्यात फुटबॉल क्रेझी देशात हा वर्ल्डकप होतोय.

 

पण यावर सावट आहे ते सध्या ब्राझीलमध्ये सुरू असणार्‍या वेगवेगळ्या आंदोलनांचं आणि निदर्शनांचं.. आत्तापर्यंत ब्राझीलनं सर्वात जास्त 5 वेळा वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलंय. त्यामुळे यावर्षी आपल्या होम ग्राऊंडवर ब्राझील कशी कामगिरी करतंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर गतविजेते आणि वर्ल्ड नंबर 1 स्पेन पुन्हा एकदा आपला धडाका दाखवते का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड कपवर आंदोलनाचं सावट

वर्ल्ड कपला आता फक्त एका दिवसाचा अवधी उरला आहे. पण या वर्ल्ड कपवर आंदोलनं आणि निदर्शनांचं सावट आहे. ब्राझीलच्या साओ पाओलो शहरात सबवे कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वर्ल्ड कप स्पर्धेत गोंधळ घालू असा इशाराही त्यांनी दिलाय.

 

खरं तर मजदूर युनियननं आपलं आंदोलन मागे घेतलंय. पण आज रात्री ते अंतिम निर्णय घेणार आहेत. वाढीव पगाराच्या मागणीसाठी सुरु झालेल्या आंदोलनानं यानंतर वेगळं वळणं घेतलंय. जेव्हा 42 कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई करत नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं.

 एक नजर वर्ल्ड कपच्या ग्रुप्सवर

ग्रुप ए

 • ब्राझील
 • क्रोएशिया
 • मेक्सिको
 • कॅमेरून

ग्रुप बी

 • स्पेन
 • हॉलंड
 • चिली
 • ऑस्ट्रेलिया

ग्रुपा्रुप सी

 • कोलंबिया
 • ग्रीस
 • आयव्हरी कोस्ट
 • जपान

ग्रुप डी

 • उरुग्वे
 • कोस्टारिका
 • इंग्लंड
 • इटली

ग्रुपा्रुप ई

 • स्वित्झर्लंड
 • इक्वेडोर
 • फ्रान्स
 • हाँडुरास

ग्रुप एफ

 • अर्जेंटिना
 • बोस्निया
 • इराण
 • नायजेरिया

ग्रुप जी

 • जर्मनी
 • पोर्तुगाल
 • घाना
 • अमेरिका

ग्रुप्रुप एच

 • बेल्जियम
 • अल्जेरिया
 • रशिया
 • कोरिया

वर्ल्डा कपची ठिकाणं

 • रिओ डी जिनेरो
 • ब्राझिलिया
 • साओ पाओलो
 • सॅल्व्हॅडोर
 • बेलो हॉरिझॉन्ते
 • कुईबा
 • फोर्टालिझा
 • नेटाल
 • रेसिफ
 • क्युरिटिबा
 • मॅनॉस
 • पोर्टो ऍलिग्रे

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close