सिंचन घोटाळ्याच्या अहवालावर राष्ट्रवादीने चर्चा टाळली

June 11, 2014 10:35 PM0 commentsViews: 692

Image img_226572_sinchan346_240x180.jpg11 जून : सिंचन घोटाळ्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणार्‍या सिंचन घोटाळ्या प्रकरणाचा कॅगचा विशेष अहवाल सरकारला मिळाला. पण तो विधामंडळात मांडण्यावरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले आहे.

त्यामुळे आज (बुधवारी) संध्याकाळी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅगचा हा अहवाल राज्यपाल के. शंकरनारायन यांची संमती घेऊन विधिमंडळात मांडण्याचा निर्णय झाला. पण सिंचन घोटाळ्यावरच्या चितळे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा करण्याचं राष्ट्रवादीनं टाळलं.

तसंच प्रादेशिक असमतोलावरचा विजय केळकर समितीच्या अहवालवरही चर्चा करणं सरकारनं टाळलं. त्यामुळे हे सर्व अहवाल शेवटच्या दिवशी घाई घाईत विधिमंडळात मांडले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, चितळे समितीच्या अहवालात प्रकल्पांची जबाबदारी सरकारी अधिकार्‍यांवर निश्चित केल्याचं समजतंय. तर कॅगच्या अहवालात सिंचन अनागोंदीवरून कडक ताशेरे ओढवण्यात आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close