बालदिनानिमित्त : जीवनाची नव्यानं सुरुवात

June 12, 2014 9:45 AM0 commentsViews: 146

रोहन कदम, मुंबई
12  जून : आज जागतिक बालमजुरीविरोधी दिवस. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात हजारो मुलं आजही बालमजूर म्हणून काम करतात. मात्र काही स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणांच्या पुढाकाराने हे प्रमाण आता कमी होण्यास मदत होत आहे. बालमजुरीतून सुटका होऊन परत आपलं जीवन इतर मुलांप्रमाणे जगण्याची संधीही अनेक मुलांना मिळू लागली आहे.

‘कोई लोग बच्चों को पैसा देते है, कोई दिखावे के लिए खाना देते है, यह सब गलत है. अगर आपको कुछ करना है बालमजुरी के खिलाफ, तो संस्था मे डाल दो, कोई लडकी है तो उसे गर्ल्स हॉस्टेल मे डाल दो’, हे आवाहन आहे शहानवाज आणि त्याचा मित्र कृष्णाचं. हे दोघे सध्या कॉलेजमध्ये शिकतात. मात्र काही वर्षांपूर्वी घरच्या परिस्थितीमुळे या दोघांना आपलं शिक्षण सोडावं लागलेलं आणि कामासाठी बालमजुरीकडे वळावं लागलं.

शहानवाजप्रमाणे कृष्णाही लहानपणी हॉटेलमध्ये काम करायचा. रोजचं कष्टाचं जीवन जगत असताना या दोघांचा संपर्क झाला तो बालमजुरीविरोधात काम करणार्‍या प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्यांशी आणि दोघांना संधी मिळाली पुन्हा आपलं जीवन इतर मुलांप्रमाणेच घडवण्याची.

ज्या मुलांना अजिबात कुठे घर नाही, आई-वडील नाहीत त्यांना शेल्टरमध्ये ठेवतो. तिथे आमचे शिक्षक आहेत. या मुलांना वळण लावणे, शिक्षण देणे बाकीच्या ऍक्टिव्हिटी देणे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शाळेत टाकलं. आमचा अनुभव असा आहे की शाळेनंही त्यांना चांगलं सहकार्य केलं, असं प्रथम संस्थेच्या संस्थापक फरिदा लांबे म्हणतात. प्रथमच्या प्रयत्नांना साथ देत आता या दोघांनी आपला नवीन प्रवास सुरू केला आहे.

प्रथमला आलो तेव्हा मला आठवीला जॉईंट केलं. मी आठवीला चांगल्या मार्कानं पास झालो मग नववी आणि दहावी, आता मी बारावी पास झालो असं कृष्णा खरटमोल आनंदाने सांगतो.

शहानवाज आणि कृष्णाप्रमाणे मुंबईसारख्या शहरात आजही 10 ते 12 हजार मुलं बालमजूर म्हणून काम करताहेत. सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था तर या विषयावर काम करताहेत. मात्र आता डोळे उघडे ठेऊन आपल्या आसपास होणारी बालमजुरी थांबवण्याची खरी जबाबदारी आहे ती आपली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close