गुगल डूडलवरही ‘फिफा’चा फिव्हर

June 12, 2014 9:52 AM0 commentsViews: 270

google doodle12  जून : आजपासून फुटबॉल फिव्हरला सुरुवात होतेय. ब्राझीलमध्ये रंगणार्‍या फिफा वर्ल्ड कपच्या निमित्ताने गुगलनेही आपल्या होमपेजवर एक मस्त डूडल तयार केलं आहे.

गुगलच्या डूडलवर क्लिक केल्यावर फुटबॉलसह बॅकग्राऊंडमध्ये बदल होण्यास सुरुवात होते आणि ब्राझीलमधल्या प्रसिद्ध ठिकाणांची दृश्यं दिसू लगतात आणि समोर ‘GOOGLE’ही अक्षरे उड्या मारत, जल्लोष करताना दिसतात.

ब्राझीलमध्ये आजपासून ते 13 जुलैपर्यंत वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी महायुद्ध रंगणार आहे. 32 टीम्स 64 मॅचमध्ये एकमेकांना भिडतील. ब्राझीलच्या एकूण 12 शहरांमध्ये हा वर्ल्ड कप खेळवला जाईल. जगातल्या सर्वांत फुटबॉल क्रेझी देशात हा वर्ल्ड कप होतोय पण यावर सावट आहे ते सध्या ब्राझीलमध्ये सुरू असणार्‍या वेगवेगळ्या आंदोलनांचं आणि निदर्शनांचं. आतापर्यंत ब्राझीलनं सर्वात जास्त म्हणजे 5 वेळा वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलंय. त्यामुळे आपल्या होम ग्राऊंडवर ब्राझील कशी कामगिरी करतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर गतविजेते आणि वर्ल्ड नंबर 1 स्पेन पुन्हा एकदा आपला धडाका दाखवणार का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close