बारामतीमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार

June 12, 2014 1:10 PM0 commentsViews: 3186

rape-victims-12  जून : बारामती तालुक्यातील पणदरेतल्या 16 वर्षांच्या मतिमंद मुलीवर बलात्कार. ही मुलगी 7 महिन्यांची गरोदर असून पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. मुलीला खाऊसाठी 10 रुपये देतो असं सांगून आधी आरोपी नितीन गायकवाड आणि नंतर इतरही काही जणांनी बलात्कार केल्याची पीडित मुलीच्या आईची तक्रार, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पीडित मुलीचे आई-वडील कामाला गेल्यानंतर त्याचा फायदा घेऊन आरोपींनी हे कृत्य केलंय. याबाबत आरोपी नितीन गायकवाडला पोलिसांनी अटक केलीय तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेतायत. आरोपी नितीन गायकवाडला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close