मुंबईत समुद्राला उधाण

June 12, 2014 2:26 PM0 commentsViews: 11634

12  जून :  मुंबईत अरबी समुद्राला आज मोठी भरती आली. त्यामुळे मुंबईच्या किनार्‍याच्या बाजूच्या रस्त्यांवर समुद्राचं पाणी मोठ्या प्रमाणात आलं आहे. दादरमध्ये समुद्रकिनार्‍यालगतच्या रस्त्यांवर पाणी साचलं त्यामुळे तिथल्या लोकांची त्रेधातिरपीट उडाली. प्रवाशांना आपल्या गाड्या साचलेल्या पाण्यातूनच काढाव्या लागल्या. वरळी सीफेसवरही मोठ्या लाटा आल्या. त्यामुळे तिथं सुशोभिकरणासाठी लावलेल्या कठड्यांच्या लाद्या उखडून रस्त्यावर आल्या आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close