गडचिरोलीत धानोर्‍यामध्ये निवडणूक कर्मचार्‍यांवर नक्षलवादी हल्ला

April 16, 2009 10:09 AM0 commentsViews: 6

16 एप्रिल राज्यातलं मतदान नक्षलग्रस्त कारवायांच्या पट्‌ट्यात सुरू आहे. कडक सुरक्षा बंदोबस्त असूनही गडचिरोलीत धानोर्‍यामध्ये निवडणूक कर्मचार्‍यांवर हल्ला झाला. मतदानात अडथळा आणण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न होता पण पोलिसांनी हा हल्ला परतून लावण्यात यश मिळवलं.आता इथली परिस्थिती नियंत्रणाखाली आली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं नक्षलवादविरोधी पथकाचे आयजी पंकज गुप्ता यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं आहे. गडचिरोलीत सकाळी 7 ते 3 या वेळेत मतदान होत आहे. नक्षलवादी हल्ल्याचा हा डाव हाणून पाडला असला तरी गडचिरोली आणि भंडारा-गोंदियामधल्या मतदानावर नक्षलवाद्यांच्या कारवायांचं सावट कायम आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी या भागात जाळपोळ केली होती. त्यामुळे गडचिरोलीतल्या मतदान केंद्रांना युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे. याची दक्षता घेऊन नक्षलग्रस्त भागातल्या मतदानाच्या वेळाही बदलण्यात आल्याचं समजतंय.

close