आदिवासींचं ठिय्या आंदोलन

June 12, 2014 11:50 AM0 commentsViews: 74

12  जून :  आदिवासी विकास खात्यातल्या भ्रष्टाचाराविरोधात आदिवासींनी ठिय्या आंदोलन केलं आहे. काल रात्रीपासून हे आदिवासी विकास आयुक्तालयासमोर मुक्काम करुन आहेत.लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आयोजित या आंदोलनात धुळे, नंदुरबार आणि जळगावमधले शेकडो आदिवासी सहभागी झालेत. नाशिकमध्ये आदिवासी विकास आयुक्तालयासमोर हे आदिवासी ठाण मांडून बसलेत. आदिवासी विकास खात्यातल्या भ्रष्टाचाराविरोधात शासनानं श्वेतपत्रिका काढावी, वनजमिनींचे प्रलंबित दावे निकाली काढावेत या त्यांच्या मागण्या आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close