गेट..सेट..गोल !

June 12, 2014 8:34 PM0 commentsViews: 281

12 जून : अखेर वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन संपलंय. फुटबॉलच्या देशात, ब्राझीलमध्ये वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होतेय. संपूर्ण जगात या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ब्राझीलमध्ये मात्र दोन चित्र बघायला मिळत आहे. जगात या स्पर्धेची एक्सायटमेंट तर आहेच पण ब्राझीलमध्ये या वर्ल्ड कप दरम्यान आंदोलनंही पाहायला मिळत आहेत.या वर्ल्ड कपसाठी ब्राझील कसा सज्ज झालाय.

जगातील प्रत्येक फुटबॉल फॅनसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण फुटबॉलच्या पंढरीत अखेर वर्ल्ड कपची धूम रंगतेय. तब्बल 5 वेळा वर्ल्ड कप जेतेपद पटकावण्याची किमया करणार्‍या ब्राझीलमध्ये या वर्ल्ड कपची रंगत काही औरच बघायला मिळतेय पण या वर्ल्ड कपच्या एक्साईटमेंटला काळीमा फासलाय तो ब्राझीलमध्ये होत असलेल्या आंदोलनं आणि निदर्शनांमुळे..

आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लोकशाहीत घडत असतात. यामुळेच आमची लोकशाही बळकट होतेय. या संघटनांचं म्हणणं आम्ही ऐकलंय. योग्य तो तोडगा लवकरच काढू असं आश्वासन ब्राझीलचे राष्ट्रपती डिल्मा रॉसेफ यांनी दिलं.

ब्राझीलमधील निदर्शनं ही काही संपायचं नाव घेत नाहीत. गेल्या वर्षी झालेल्या कॉन्फडरेशन कप दरम्यान या आंदोलनांना सुरुवात झाली. वर्ल्ड कपची तयारी आणि 2016 ला होणार्‍या रिओ ऑलिम्पिकच्या खर्चावर ब्राझीलची जनता सरकारला प्रश्न विचारतेय. बहुतांशी
आंदोलनं ही शांततेत पार पडली तर काही अपवादही बघायला मिळाले आहेत.

010 मध्ये वर्ल्ड कपची तयारी जेव्हा सुरू झाली, तेव्हापासूनच आम्ही शिक्षण आणि आरोग्य सेवेवर जवळपास 762 बिलियन डॉलर्स इतका खर्च केलाय. म्हणजे वर्ल्ड कपवर जितका खर्च केला गेलाय, त्याच्या 212 टक्के जास्त खर्च आम्ही शैक्षणिक सोईसुविधा आणि आरोग्य सुविधांवर केलाय अशी माहिती डिल्मा रॉसेफ् यांनी दिली.

ब्राझील या मोठ्या स्पर्धांचं आयोजन तर करतंय पण पायाभूत सोई सुविधांची वानवा प्रकर्षानं जाणवतेय. अगदी शेवटच्या दिवसांत स्टेडियम्स तयार केली गेली आहेत. साओ पाओलोमध्ये जिथे ओपनिंग सेरेमनी रंगतोय तिथे सबवे कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. त्यामुळे या गोंधळात भर पडली. त्यामुळे फक्त ‘ऑन फिल्डच’ नाही तर ‘ऑफ द फिल्ड’ही ब्राझील श्वास रोखून वर्ल्ड कपसाठी सज्ज झालंय.

उद्घाटन सोहळ्याची रंगत

– साओ पाओलोच्या अरिना स्टेडियमवर रंगणार सोहळा
– पिटबूल, जेनिफर लोपेझ सादर करणार वर्ल्ड कप थीम साँग
– ब्राझिलियन साम्बाची खास मेजवानी
– ब्राझिलियन गायिका क्लॉडिया लिट्टे सादर करणार खास कार्यक्रम
– LED बॉल उद्घाटन सोहळ्याचं प्रमुख आकर्षण
– 600 कलाकार करणार नृत्याविष्कार
– ब्राझीलच्या विविधतेचं दर्शन
– वर्ल्ड कपची सुरुवात बहुविकलांग व्यक्ती फुटबॉलला किक मारून करणार
– आतषबाजीचा वापर होणार नाही

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close