पहिल्या टप्प्यात राज्यात 54 तर देशात 60 टक्के मतदान

April 16, 2009 3:58 PM0 commentsViews: 12

16 एप्रिल 15 व्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात राज्यात 54 तर देशात 60 टक्के मतदान झालं. महाराष्ट्रातल्या 13 मतदार संघासह इतर राज्यातल्या 124 मतदारसंघात सरासरी 50 टक्के मतदान झालं. मतदान उधळण्याचा नक्षलवाद्यांचा इरादा हाणून पाडत देशातल्या नागरिकांनी मतदान केलं. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने नक्षली पट्‌ट्यात मतदान होत असल्यानं कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. तरीही निवडणूक प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी हल्ले केले. बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगडच्या अनेक मतदान केंद्रांवर हल्ले करण्यात आले. तर राज्यातल्या गडचिरोलीतही नक्षलवाद्यांनी निवडणूक कर्मचार्‍यांवर हल्ला केला. असं असतानाही या निवडणुकीत मतदारांनी दहशतीची भीती झुगारून दिल्याचं दिसलं. ओरिसातल्या हिंसाचारग्रस्त कंधमालमध्ये तर उच्चांकी 90 टक्के मतदान झालं. ख्रिश्चनांवरील हल्ल्यामुळे गाजलेल्या कंधमालमध्ये मतदान छावण्यांमध्ये मतदान सुरू होतं. कंधमालमध्ये मतदान शांततेत पार पडलं. राज्यात अमरावती, अकोला, नागपूर, हिंगोली, परभणी, नांदेड यासह मराठवाड्यातल्या तीन आणि विदर्भातल्या दहा मतदारसंघांमध्ये मतदान झालं. अमरावतीत सुरुवातीला 5 टक्के मतदान झालं. तर नागपूरमध्ये मतदानासाठी तरुणांनी मोठ्या संख्येनं रांगा लावल्या होत्या. वर्ध्यात सकाळपासून मतदानाला फारसा प्रतिसाद नव्हता. वर्ध्यातल्या 41 डीग्री सेल्सिअस तापमानामुळे आणि कडक उन्हामुळे मतदानात कमालीची घट झाल्याचं आढळून आलं. मात्र गडचिरोलीत मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मतदार यादीतल्या नावांच्या घोळामुळे अनेक मतदार गडचिरोलीत मतदानापसून वंचित राहिले. __PAGEBREAK__ For Pagging धानो-यात नक्षलवादी हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. पण कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे हल्ला परतवून लावला. रायफलमधून चुकून गोळी सुटल्यामुळे जवानाचा मृत्यू झाला. ब्रम्हपुरी आणि चिमूर वगळता अन्य विधानसभा मतदार संघात तीन वाजेपर्यंत मतदान झालं. या भागात नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत होती. कुरखेडा तालुक्यातील सोनरांगी गावतील सर्व लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. पुसदमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचा प्रभाव मतदानावर दिसला.त्यामुळे फार कमी मतदान झालं. बुलढाणा-शेगाव तलुक्यातील तरोडा गावानं मतदानावर बहिष्कार टाकला.जिल्हाधिका-यांच्या मध्यस्तीलाही तरोडा गावानं फारसा प्रतिसाद मिळाला नाही. निवडणूक कर्मचार्‍यांनाही गावकर्‍यांनी गावात प्रवेश दिला नाही. जामोद येथील सहा आदिवासी गावांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. नांदेडमधल्या कुलकर्णी आडनावाच्या पतीपत्नींनी तर, त्या विभागात सर्वात पहिल्यांदा मतदान करण्याचा नियम यंदाही पाळला. आंध्रप्रदेशात प्रजाराज्यमच्या चिरंजीवीनंही आपला मतदानाचा हक्क बजावला. केरळमध्ये मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. तिथे साधारण 60 टक्के मतदान झालं. त्यापैकी सर्वाधिक मतदान एर्नाकुलम येथे म्हणजेच 67.5 टक्के इतकं झालं. तर तिरुवनंतपूरम सर्वात कमी मतदान झालं. याच मतदानसंघातून काँग्रेसने युएनचे माजी सेक्रेटरी जनरल शशी थरुर उमेदवारी दिली आहे. तिरुवनंतपूरममध्ये 45.4 टक्के इतकं मतदान झालं. देशात 124 मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी – बिहार- 46 टक्के, महाराष्ट्र- 60 टक्के, नागालँड- 84 टक्के, उत्तरप्रदेश- 50 टक्के, लक्ष्यद्वीप- 86 टक्के, केरळ- 60 टक्के, ओरिसा- 53 टक्के, जम्मू-काश्मिर- 48 टक्के. राज्यात 13 मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी – नांदेड- 50 टक्के , परभणी- 51 टक्के, हिंगोली – 52 टक्के, रामटेक – 55 टक्के, नागपूर – 56 टक्के, गडचिरोली – 54 टक्के, भंडारा – गोंदिया 65 टक्के, वर्धा – 42 टक्के, चंद्रपूर – 43 टक्के, अकोला-48 टक्के, अमरावती – 47 टक्के , बुलडाणा – 49 टक्के, यवतमाळ – वाशिम 44 टक्के.