एलबीटीचा तिढा कायम, बैठका निष्फळ !

June 12, 2014 9:59 PM0 commentsViews: 136

Image img_238482_lbt34534_240x180.jpg12 जून : एलबीटीबद्दल तोडगा काढण्यासाठी आज (गुरुवारी)पुणे, कोल्हापूर, नाशिक,नागपूरमध्ये व्यापारी आणि महापालिकांमध्ये बैठका झाल्या. पण या बैठकांमधून ठोस तोडगा मात्र निघालेला नाही. कोल्हापूर शहरात 2 वर्षांपूर्वी एलबीटी कर लागू करण्यात आलाय. तरीही इथले व्यापारी आजही एलबीटीला विरोध करत आहेत.

मात्र दुसरीकडे महापालिकेच्या कर्मचारी संघटनेनं मात्र एलबीटी रद्द करू नका अशी मागणी केलीय. गेल्या 2 दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलनही करत आहेत. पुण्यात महापौर-आयुक्त आणि व्यापरी प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. महापौरांनी व्यापार्‍यांची मतं सरकारला कळवू असं मत व्यक्त केलं.

महापालिकेला मिळणारं उत्पन्न मिळालंच पाहिजे मग जकात असो अगर एलबीटी तो सरकारनं घ्यावा असं मत व्यक्त केलं. तर नाशिकच्या महापौरांनी शहरातल्या व्यापार्‍यांची बैठक घेतली. शहरातल्या 26 व्यापारी संघटना त्यात सहभागी झाल्या. तर विधानसभेच्या अधिवेशनापर्यत वाट पाहू आणि त्यानंतर आम्ही आमची रणनिती ठरवू असा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पोपट ओस्वाल यांनी दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close