अमेरिकेन तरुणीवर बलात्कार प्रकरणी पाच जणांना अटक

April 17, 2009 6:08 AM0 commentsViews: 5

17 एप्रिलमुंबईत देवनार इथल्या टाटा समाजविज्ञान संस्थेत शिकणा-या एका अमेरिकेन तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी तिच्या सहा पैकी ट्रॉम्बे पोलिसांनी पाच मित्रांना अटक केली आहे. काल तिघांना अटक झाली होती तर आज दोघांना. अन्य एका संशयीत मित्राचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. फरारी संशयिताच्या शोधासाठी बिहार आणि झारखंडमध्ये पोलिसांचं शोध पथक रवाना करण्यात आलं आहे. देवशी, अनिश बोरकादगी, कुंदन राज, जसकरण सिंग आणि हर्षवर्धन ही पोलिसांनी अटक केलेल्या त्या पाच जणांची नावं आहेत. याप्रकरणातला सहावा आरोपी विनम्र सोनी हा फरार आहे.मुंबईत देवनार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या एका अमेरिकन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना मंगळावरी समोर आली होती. शनिवारी या विद्यार्थीनीवर तिच्या सहा मित्रांनी बलात्कार केला होता. त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. नंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. आधी अटक केलेल्या तिघांना कुर्ला कोर्टानं अठ्ठावीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. बलात्कार करणार्‍यांमध्ये दोघंजण टीआयएसएसचेच विद्यार्थी असल्याचं समजतंय. दरम्यान बलात्काराची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पोलिसांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिल्यानंतर तिथल्या पोलीस कर्मचार्‍याने आपल्याला नीट माहिती दिली नाही, असा आरोप तिने केलाय. तसंच हॉस्पिटलमधूनही आपल्याला मदत मिळाली नसल्याचा आरोप तिने केलाय. पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीनंतर यापुढे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची आपली इच्छा, नसल्याचंही त्या अमेरिकन पीडित मुलीने म्हटलं आहे.

close