ब्राझीलची विजयी सलामी, क्रोएशियावर 3-1 ने मात

June 13, 2014 10:34 AM0 commentsViews: 467

winbrazhil234213 जून : संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून असलेल्या फिफा वर्ल्ड कपची शानदार सुरुवात झाली. डोळे दिपवून टाकणार्‍या दिमाखदार सोहळा म्हणजे ब्राझीलचे संस्कृती, लोक आणि त्यांचं फूटबॉल प्रेम यांना केलेला सलामच होता. ऍरेना दे साओ पावलो पिचच्या मध्यभागी ठेवण्यात आलेल्या लिव्हींग बॉलवर हा संपूर्ण सोहळा केंद्रीत होता. जवळपास 660 कलाकार यावेळेस झालेल्या तीन परफॉरमन्समध्ये सहभागी झाले होते. यावेळेला क्लॉडिया लिट, जोनिफर लोपेझ आणि पिटबुल यांनी वुई आर वन हे वर्ल्ड कपचं ऑफिशियल साँग सादर केलं.

 

या सोहळ्यानंतर संपूर्ण जगाच लक्ष लागून होते ते ब्राझील आणि क्रोएशियाच्या सलामी लढतीकडे. साओ पावलोमध्ये झालेल्या सलामी सामन्यात ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार ने केलेल्या गोल्सच्या जोरावर ब्राझीलने क्रोएशियावर 3-1 ने मात केली. पण या गेमची सुरुवात मात्र धक्कादायक झाली. 11 व्या मिनिटाला क्रोएशियाने गोल नोंदवत ब्राझीलवर आघाडी घेतली पण हाफ टाईमच्या आधीच नेयमारने गोल केला आणि ब्राझीलने बरोबरी साधली. नेयमारनेच मग ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. पेनल्टी किकवर त्याने पुन्हा गोल नोंदवला आणि त्यानंतर ऑस्करने तिसरा गोल नोंदवून ब्राझीलला विजय मिळवून दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close