आजही दर्याला उधाण

June 13, 2014 3:54 PM0 commentsViews: 2709

13 जून : मान्सून दाखल व्हायच्या आधी दर्याला उधाण आलेलं आहे. गुरुवारी मुंबईत अरबी समुद्राला मोठी भरती आली होती ती आजही कायम आहे. कालसारखाच आजही दर्या खवळलेला आहे. आजही मोठी भरती आलेली आहे. ताशी 50 किलोमीटर वेगाचे वारे आणि 4.69 मीटर उंचीच्या लाटा धडकण्याचा अंदाज आहे. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटीवर लाटांनी धुमशान घातले आहे. गुरुवारी लाटांचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे दादरमध्ये काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लाटांपासून सावध राहण्याचा आणि समुद्रात न जाण्याचा इशारा पालिकेनं दिला आहे. मात्र दर्याला आलेलं उधाण पाहण्यासाठी मुंबईकरांनी चौपाटीवर गर्दी केलीय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close